Posts

Showing posts from May, 2022
Image
केळी विक्री करून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धित पदार्थ करून जर विक्री केली तर अधिक नफा कमवू शकतो ही गोष्ट येथील महिलांना पटलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच तेथील उमेद अभियाना च्या महिला बचत गटा हे ॲक्टिवआहेत. केळी विक्री करून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धित पदार्थ करून जर विक्री केली तर अधिक नफा कमवू शकतो ही गोष्ट येथील महिलांना पटलेली आहे. परंतु कोणताही उद्योग करायचा तर त्याला शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक प्रशिक्षणाची गरज असते. म्हणूनच अर्धापूर तालुक्यातील लहान, मालेगाव, दाभड, अर्धापूर, नांदला दिग्रस, उमरी, पाटणूर आणि येळेगाव गावांमधील महिला साठी कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे आज दिनांक 19/4/2022 रोजी केळी पासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे हे प्रशिक्षण आयोजित केले गेले. या प्रशिक्षणामध्ये केळीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व त्याचे विविध मूल्यवर्धित पदार्थ जसे चिप्स लोणचे पावडर सुकेळी यांची सखोल माहिती देऊन प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. तसेच उद्योगाला लागणारे परवाने, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थांची पॅकेजिंग आणि ब्रँडि...

"किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" अभियानांतर्गत शेतकरी मेळावा...

Image
  "किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" अभियानांतर्गत शेतकरी मेळावा... स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित "किसान भागीदारी प्राथमिकता हमारी" अभियानांतर्गत संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड कडून मौजे होट्टल तालुका देगलूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मच्छिंद्र मुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ती हरबल बायोटेक लिमिटेड पुणे ) यांनी औषधी वनस्पती करार शेती अंतर्गत अश्वगंधा, चिया, सोना मोती व काळा गहू इ. पिकाच्या करार शेती विषयी शेतकऱ्यांना अवगत केले. तसेच दुसरे मार्गदर्शक श्री विजय कुलकर्णी यांनी मोहगणी करार शेती करून कार्बन क्रेडिट कसे मिळवता येईल व परंपरागत शेतीसोबत वन शेतीची जोड दिल्यास शेतकरी अधिक नफा व निसर्गाचे संवर्धन करू शकतील असे मत मांडले. बँकेचे प्रतिनिधी श्री संगेवार यांनी वैयक्तिक शेतकऱ्यांना, शेतकरी गटांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणाऱ्या विविध बँक कर्जाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी व...

शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे...

Image
  शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे... दोन दिवसीय नैसर्गिक शेती या विषयावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात नैसर्गिक शेती म्हणजे काय? शेतावर तयार करण्यात येणाऱ्या विविध जैविक निविष्ठा, जैविक खते व कीडनाशके वापर, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण व विक्री व्यवस्था इत्यादी विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींनी सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा जीवामृत, बीजामृत ,अमृतपाणी, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, वेस्ट डीकंपोजर व ई एम वापर ,कंपोस्ट खत व गांडूळ खत निर्मिती, निमास्त्र ,गो -कृपाअमृत इत्यादी निविष्ठा निर्मिती चे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या नैसर्गिक शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. सर्व प्रशिक्षणार्थींना जैविक निविष्ठा वेस्ट डीकंपोजर व ट्रायकोडर्मा बुरशीनाशक व सेंद्रिय शेती पुस्तिका देण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व व्यंकट शिंदे व प्रशिक्षण समन्वयक श्री तुकाराम मंत्री यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन क...